शिरूर वेध
newspaper ई-पेपर
search

संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपती मंदिरात फुलांची आकर्षक सजावट

A

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

WhatsApp शेअर Facebook X (Twitter)
संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपती मंदिरात फुलांची आकर्षक सजावट

शिरूर प्रतिनिधी:

संकष्टी चतुर्थी निमित्त पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. तसेच संकष्टी चतुर्थी श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट अयोजनाने *सामूहिक अथर्वशीर्ष पठण* कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांसाठी उत्तम प्रकारे जलद दर्शन व्यवस्था, पिण्याचे पाणी, खिचडी प्रसाद इत्यादी सुविधा देवस्थान ट्रस्ट तर्फे देण्यात आल्या अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. स्वातीताई दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांनी सांगितले.

Gold shop
संकष्टी चतुर्थी निमित्त दुपारी १२ वाजता देवस्थान ट्रस्ट मुख्यविश्वस्त ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा व महानैवेद्य करण्यात आला.

तसेच प्रगतशील शेतकरी श्री नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने मंदिर परिसरात व मंदिर गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्यात आली.

श्री महागणपती भजनी मंडळ, रांजणगाव गणपती यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. गणेश भक्त श्री भावेश कामदार यांच्या कडून ५ कॅरेट केळींचा महाप्रसाद देण्यात आला.यावेळी देवस्थान चे विश्वस्त मंडळ मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव, अध्यक्षा स्वातीताई पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदिप दौंडकर, उपाध्यक्ष डॉ. तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव, चेअरमन दत्ताशेठ पाचुंदकर पाटील, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, पांडुरंग चोरगे, हिशोबणीस संतोष रणपिसे, जनसंपर्क अधिकारी रमाकांत शेळके तसेच देवस्थान कर्मचारी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

A

Abhijeet

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

कोंढापुरीचा उड्डाणपूल रांजणगाव गणपतीपर्यंत जोडावा!
सामाजिक

कोंढापुरीचा उड्डाणपूल रांजणगाव गणपतीपर्यंत जोडावा!

शिरूर पोलिसांची पाबळ फाटा चौकात विशेष नाकाबंदी मोहीम;
पोलीस

शिरूर पोलिसांची पाबळ फाटा चौकात विशेष नाकाबंदी मोहीम;

गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपीस शिरूर पोलिसांकडून बेड्या
गुन्हेगारी

गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपीस शिरूर पोलिसांकडून बेड्या

श्री संत गोविंदबाबा पायी दिंडी सोहळ्याचे मोठ्या भक्तिभावात  राजापूर गावातून आळंदीकडे प्रस्थान
सामाजिक

श्री संत गोविंदबाबा पायी दिंडी सोहळ्याचे मोठ्या भक्तिभावात राजापूर गावातून आळंदीकडे प्रस्थान