शिरूर वेध
newspaper ई-पेपर
search

शिरूर पोलिसांची पाबळ फाटा चौकात विशेष नाकाबंदी मोहीम;

A

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

WhatsApp शेअर Facebook X (Twitter)
शिरूर पोलिसांची पाबळ फाटा चौकात विशेष नाकाबंदी मोहीम;
“

118 वाहनांवर कारवाई, 1 लाख 2 हजार 600 रुपयांचा दंड

शिरूर प्रतिनिधी


शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी शिरूर शहरातील पाबळ फाटा चौक येथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. सदर मोहीम रवींद्र भोसले , उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर विभाग, शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. या नाकाबंदी मोहिमेदरम्यान भूषण माने परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक हे स्वतः उपस्थित होते.


सदरील नाकाबंदी दरम्यान ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. यामध्ये ट्रिपल सीट वाहन चालविणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे (ड्रंकन ड्राइव्ह), वाहन चालविण्याचा परवाना जवळ न बाळगणे, विना नंबर प्लेट वाहन चालविणे, वाहनांना काळ्या काचा लावणे, मॉडिफाइड सायलेन्सरचा वापर करणे, फॅन्सी नंबर प्लेट लावणे तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.


सदर विशेष नाकाबंदी मोहिमेदरम्यान एकूण 118 वाहनांवर कारवाई करून 1,02,600/- रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे.


सदर नाकाबंदी मोहिमेमध्ये 01 पोलीस निरीक्षक, 03 पोलीस उपनिरीक्षक, 15 पोलीस अंमलदार, 06 महिला पोलीस अंमलदार, 03 वाहतूक पोलीस अंमलदार व 05 होमगार्ड असे एकूण 33 पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.

Gold shop


वाहतूक नियमांचे पालन व्हावे, रस्ते अपघातांना आळा बसावा, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर नियंत्रण राहावे तसेच नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने सदर विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली.


सदर कारवाई रवींद्र भोसले , उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली भूषण माने , परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक व शिरूर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सर्व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, वाहनांची आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत व मद्यप्राशन करून वाहन चालवू नये. स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी.

A

Abhijeet

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

नवीनतम अद्यतन

कोंढापुरीचा उड्डाणपूल रांजणगाव गणपतीपर्यंत जोडावा!
सामाजिक

कोंढापुरीचा उड्डाणपूल रांजणगाव गणपतीपर्यंत जोडावा!

गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपीस शिरूर पोलिसांकडून बेड्या
गुन्हेगारी

गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपीस शिरूर पोलिसांकडून बेड्या

श्री संत गोविंदबाबा पायी दिंडी सोहळ्याचे मोठ्या भक्तिभावात  राजापूर गावातून आळंदीकडे प्रस्थान
सामाजिक

श्री संत गोविंदबाबा पायी दिंडी सोहळ्याचे मोठ्या भक्तिभावात राजापूर गावातून आळंदीकडे प्रस्थान

संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपती मंदिरात फुलांची आकर्षक सजावट
सामाजिक

संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपती मंदिरात फुलांची आकर्षक सजावट